Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरी गेलेल्या शेळ्यासह आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात!

अमळनेर, प्रतिनिधी | येथील सप्तश्रृंगी मंदीर समोरील शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी ६३ शेळ्या चोरून नेल्या होत्या. मात्र पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेशातून २६ शेळ्यासहित आरोपी व त्याच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, अमळनेर येथील जालंदरनाथ सुरेश चौधरी हे सप्तश्रृंगी मंदीर समोरील शेत शिवारात त्यांच्या मालकीचे गोट फॉर्म आहे. त्याठिकाणी कामगार त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दरम्यान १७ आक्टोंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना घरात कोंडले. व एका खोलीत बंद करून ठेवलेले ६३ शेळ्या चोरून नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात जालंदरनाथ सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि ३९५, ३४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून आरोपींवर कारवाही करण्यात येईल असे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले होते. त्यानुषंगाने अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगांव व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,अमळनेर यांनी घटनास्थळाला भेट देवून मार्गदर्शन केले. दरम्यान फिर्यादी याने आरोपी हा पवारा भाषेत बोलत असल्याचे नमूद केल्यामुळे पो.नि. जयपाल हिरे यांनी मध्य प्रदेश राज्याला लागुन चोपडा शहर व ग्रामीण, शिरपुर, सांगवी येथील माहितगार पोलीस अंमलदारांना सदरच्या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयाची माहिती कळविली होती. त्यावरुन सेंदवा येथे दुपारी एका पिकअप गाडी मध्ये ३० शेळया विक्रीस आल्या होत्या. त्यातील ५ ते ६ शेळया एका खाटीकने घेतल्या. सदर शेळया ह्या चोरीच्या आहेत. अशी माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्यानंतर तपासी अधिकारी पोउनि/ शत्रुघ्न पाटील, पोना/४२२ डॉ. शरद पाटील, पोना/२२०४ मिलींद भामरे, पोशि/५३७ अमोल पाटील यांनी सदर ठिकाण गाठून तालुक्यातील बोरली गावात एका घरात २० ते २५ शेळया कोंडून ठेवल्या आहेत. यावरुन रात्री सेंधवा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मदतीने वरील पथकाने गावातील सदर घराचा शोध घेऊन गुन्हयातील २१ मोठया व ५ लहान शेळया शोधून काढल्या. सोबत गेलेल्या फिर्यादीने सर्व शेळया त्याच्याच असल्याचे सांगितल्यावर त्या ताब्यात घेण्यात आल्या. व त्याठिकाणी आरोपी नामे सनालीया सोलंकी यास ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकीही जप्त केली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता मुकेश रिंजडीया ठोकरे (पावरा) रा.बक्तरीया, डुटला ओंकार बारेला, रा. बक्तरीया, भाया कावला भिलाला, रा. बक्तरीया, रविसुभाराम सोलंकी, रा. बोरली, तसेच मुकेश ठोकरे याच्या सोबत अधिक दोन मित्र होते. असे त्यांनी सांगितले. त्यावर अधिक तपास सुरु असून पुढील तपास पोउनि शत्रुघ्न पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version