Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरी गेलेल्या दुचाकीचा तपास लावणाऱ्यांना १० हजारांचा बक्षीस

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील बोढरे येथून एकाची दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान चोरी गेलेल्या दुचाकीचा तपास लावणाऱ्यांना १० हजारांचा बक्षीस जाहीर करण्यात आले असून चोरट्यांचे नाव सांगून हे बक्षीस आता जिंकता येणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील कपूरचंद दिना जाधव हे २३ एप्रिल रोजी नेहमी प्रमाणे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली हिरो होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी (क्र. एम.एच.१९ डीएच ९५२१) रस्त्याच्या कडेला चॅबीसहीत उभी केली. त्याचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने सदर मोटरसायकल लंपास केल्याची धक्कादायक घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मुलगा लखन जाधव यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध करून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठलं व अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम- ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दुचाकी आजपावेतो शोधाशोध करूनही मिळून न आल्याने जाधव कुटुंबियांनी वेगळी शक्कल लढवली आहे. चोरट्यांचे नाव सांगा व दहा हजार रुपयांचा बक्षीस घेऊन जा अशी घोषणा मुळ मालक लखन जाधव यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोनि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार संदिप माने हे करीत आहेत.

Exit mobile version