Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना पोलीसांनी घेतले ताब्यात!

*जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।* शहरातील एमआयडीसीतील बंद असलेल्या ट्राईडन कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील ट्राईडन बंद असलेल्या कंपनीत तीन व्यक्ती हे अस्तीत्व लपवून चेहऱ्यावर दुपट्टे घालून अंधारात फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. मुदस्सर काझी, विकास सातदिवे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंढे, सतिष गर्जे यांनी कारवाई करत संशयित आरोपी तनवीर शेख चांद (वय-२३) रा. दत्त नगर मेहरूण, जळगाव, जुम्मा सलीम पिंजारी वय 31 वर्ष रा, तांबापूरा जळगाव , मजर खान सकायत खान वय 25 वर्ष रा, पिंप्राळा हुडको, जळगांव यांच्यावर कारवाई ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version