चोरीस गेलेला महागडा मोबाईल फिर्यादीला केला परत; जिल्हापेठ पोलीसांची कामगिरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ एका मुलीचा ५९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी १७ ऑक्टोबर रोजी लांबविला होता. या गुन्ह्यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली असून मोबाईल हस्तगत करण्यात आला होता. रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हा पेठ पोलीसांनी फिर्यादीस चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता हस्ते परत देण्यात आला.

 

याबाबत घटना अशी की, पुजा दिलीप भावसार (वय-२८) रा. गणेश कॉलनी अशोक बेकरी ख्वाजा मिया जवळ ही तरूणी १७ ऑक्टोबर रेाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील अशोक बेकरीजवळ पायी जात असतांना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके १३८६) क्रमांकावरील दुचाकीवर अनोळखी तीन जणांनी धडक दिली. यात पुजा भावसार यांच्या हातातील ५९ हजार रूपये किंमती महागडा मोबाईल उचलून शिवीगाळ व धमकी देवून दुचाकीवरून पसार झाले होते. दरम्यान तरूणीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पेठपोलीस ठाण्याचे शोध पथकाने तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील महागडा मोबाईल हस्तगत केला. रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या उपस्थितीत फिर्यादीस मोबाईल परत देण्यात आला. मोबाईल मिळाल्याने जिल्हापेठ पोलीसांचे आभार मानले.

Protected Content