Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीच्या दुचाकींसह गुन्हेगाराच्या अल्पवयीन साथीदारास अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अल्पवयीन साथीदारास चोरीच्या चार मोटार सायकलींसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शनिवार, ३० जुलै रोजी दुपारी विठ्ठल नगरातून ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्यातील मास्टर माईंड गुन्हेगार फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अधिक माहिती अशी की, “जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवासी तसेच पेालीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने मोटार सायकल चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खब-याकडून समजली होती.

चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावत असतांनाच गुन्हेशाखेच्या पथकातील जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, भारत पाटील अशांच्या पथकाने हरिविठ्ठल नगरातून या अल्पवयीन संशयीताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एकामागून एक अशा चार चोरीच्या मोटारसायकल काढून दिल्या आहे. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे.

Exit mobile version