चोरीच्या ट्रॉलीसह दोन भामट्यांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके शिवारातील शेतातून ट्रॉलीची चोरी करून परस्पर विक्री करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. ट्रॉली हस्तगत केली असून दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एमआयडीसी पोलीसांकडून‍ मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली रोडवरील जळके शिवारातून ट्रक्टरची ट्रॉलीची चोरी झाल्याची घटना उघडकीला आली होती. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 501/ 2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक नेमून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी हे तालुक्यातील आव्हाने शिवारात  ट्रॉली घेऊन गेल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजय पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, अशोक पाटील यांनी सापळा रचून संशयित आरोपी सागर उर्फ गोल्या रमेश मोरे (वय 23) आणि आकाश ज्ञानेश्वर शिंदे (वय 19) दोन्ही रा. आव्हाने ता.जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता दोघांनी चार ते सहा महिन्यांपूर्वी शिरसोली गावातून जळके गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या शेतात उभी असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली दोघांसह गावातील ओळखीचा इरफान उर्फ इमरान उर्फ फुन्ना खानसाहब शेख याच्या मदतीने ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. 

त्यानंतर आव्हाने गावाच्या लगत असलेल्या महानगरपालिकेचा कचरा डेपोच्या मागे मोकळ्या जागेत उभी करून तिला तिचा रंग बदलून घेतला. चेसीच नंबर काढून फेकला. संशयित आरोपी इरफान याने बनावट कागदपत्रे बनवून विक्री केली होती. यासंदर्भात दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून ट्रॉली देखील जप्त करण्यात आले आहे.

Protected Content