Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड येथील औषध निर्माण शस्त्र विभागात मुलींचे यश

चोपडा, प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी सन 2019 -20 अंतर्गत औषध निर्माण शास्त्र विभागाचा निकाल नुकताच जाहीर केलेला आहे. विद्यापीठांतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय यांच्या १०० टक्के निकाल लागलेला आहे.

प्रथम वर्षात सलोनी घनश्याम अग्रवाल या विद्यार्थिनीने ६५० पैकी ५५० गुण प्राप्त करत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. खुशबू सुनील पाटील या विद्यार्थिनीने ६५० पैकी ५३८ गुण प्राप्त करत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. निकिता कांतीलाल पाटील हिने  ६५० पैकी ५३५ गुण प्राप्त  करत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

द्वितीय वर्षात सुद्धा मुलींनीच बाजी मारली असून नलिनी दिनेश वाघ हिने ७०० पैकी ६०५ गुण प्राप्त केले असून द्वितीय वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. दिव्या दिलीप पाटील हिने ५६६ गुण प्राप्त केलेले असून की द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. मनुजा सतीश झाडे ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तसेच तृतीय वर्षात याज्ञिकी किरण नेहाती हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तसेच तृतीय वर्षात अश्विनी अनिल पाटील व अश्विनी दिलीप पाटील या विद्यार्थ्यांने द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम प्रकाश वडनेरे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version