Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड्यात भाजपची बुथ रचना आढावा बैठक

 

चोपडा, प्रतिनिधी ।  येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धती नुसार तालुका व शहरातील बुथ रचना बळकट करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत बुथ रचनेबाबतचा आढावा विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील यांनी घेतला.

बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट व गतीमान व्हावे म्हणून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हा चिटणीस रंजना नेवे, तालुका सरचिटणीस हनुमंत महाजन, कृउबा संचालक धनंजय पाटील, शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, विनोद पाटील, पंकज पाटील, गोपाळ पाटील, भुषण महाजन, जीवन पाटील, हेमंतसिंग पाटील, प्रवीण चौधरी, नंदू धनगर, दत्तात्रय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, विजय बाविस्कर, मोहित भावे, चंद्रशेखर ठाकरे, संजय श्रावगी, भरत पाटील, रवी ठाकरे ,बाळू पाटील, विशाल भोई, एकनाथ पाटील, सुभाष पाटील, नितीन राजपूत, सागर चौधरी, गंभीर शहा यांचे सह सर्व शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Exit mobile version