Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड्यात बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील गोरगावले रोडवरील समर्थ नगरातील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने रोकड असा एकूण ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव आधार चौधरी (वय-५२) रा. समर्थ नगर, चोपडा हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. साहेबराव चौधरी हे १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत, घरातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र आणि १० हजार रुपये रूपयांची रोकड ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिश्चंद्र पवार करीत आहे.

Exit mobile version