Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा शहरात विवाहितेचे मंगळसुत्र लांबविले

चोपडा प्रतिनिधी । शहरातील आझाद चौकात बाजार करण्यासाठी आलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसुत्र धक्का देवून व गर्दीचा फायदा घेवून चोरून नेल्याप्रकरणी तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सोनाली विजय माळी (वय-३०) रा. तारामती नगर चोपडा ह्या कामाच्या निमित्ताने १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी शहरातील आझाद चौकात आल्या होत्या. दरम्यान बाजारात गर्दीचा फायदा घेत एक तरूणी आरती सुशिल मिश्रा (वय-२०) रा. मिटमिठा ता.जि.औरंगाबाद हिने सोनाली माळी यांना जोरदार धक्का दिला व गळ्यातील ९ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगल पोत चोरून नेली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तरूणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण करीत आहे.

Exit mobile version