Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा महाविद्यालयात नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

job 1

चोपडा प्रतिनिधी । चोपडा महाविद्यालय व टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सर्व १८ ते ३० वयोगटातील बेरोजगार युवक युवतींना नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी २७ फेब्रुवारी रोजी पदवीधर युवक, युवतींसाठी तर २८ फेब्रुवारी रोजी दहावी व बारावी, आयडीआय आणि इतर शैक्षणिक पात्रता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. निवड झाल्यास प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात येईल. या नोकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अर्ज २७ फेब्रुवारी २०२० रोजीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

https://forms.gle/ewEMSR5DnPqUXMnU7 या लिंकवर जाऊन ऑनलाईन नावनोंदणी करण्याची सोय केली असून ९८३४१७३९७८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेस सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आधारकार्ड, पॅन कार्ड, मार्कलिस्ट, एलसी किंवा टिसी, जातीचा दाखला, २ फोटो या आवश्यक कागदपत्रांसह कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी. पाटील, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ.के.डी. गायकवाड यांनी केले आहे.

Exit mobile version