Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा महाविद्यालयात करिअरची वाटचाल यावर मार्गदर्शन

chopda

चोपडा प्रतिनिधी । कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य व्यवस्थापन विभागातर्फे 18 फेब्रुवारी 2020 या दिवशी करियर गायडन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे वक्ते श्री राजेंद्र डांगी हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. एन. एस. कोल्हे, विभाग प्रमुख प्रा.सी. आर. देवरे, सहा. प्रा. ए. एच.साळुंखे, सहा. प्रा. आर. पी. जैस्वाल आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित असलेले वक्ते राजेन्द्र डांगी पुणे येथे सीए म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी करिअर साठी आपल्या आवडीनुसार कोणते क्षेत्र निवडावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर करिअरची वाटचाल करत असताना यशस्वी होण्यासाठी Knowledgeable Education, Practical Skills (self confidence, positive approach), Technology या चारही किती गरजेच्या आहेत याचे महत्त्व पटवून दिले.

Exit mobile version