Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । येथील कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले  चर्चासत्राचा विषय ईव्हालविंग ट्रेन्डस् इन अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन, मॅनेजमेंट ,अँड सोशल सायन्स असा होता यावेळी चर्चासत्रासाठी  ओरिसाहुन डॉ. सबतकुमार डीग्गल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कॉमर्स व मॅनेजमेंट शाखेकडेही उत्तम संधींच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आहेत. बहुव्यापक असणाऱ्या या शाखेतील विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असणारे मार्केटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, एच.आर. करिअर, अकाउंट्स, ऑडिट, बिझनेस टॅक्सेशन, कम्युनिकेशन, कॉस्टिंग या सर्व बाबींचा समावेश या बहुव्यापक शाखेत होत असल्याने सर्वसाधारण कारकीर्द करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. परिणामी, भावी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. राष्ट्रीय चर्चासत्राद्वारें  व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापकीय कलाकौशल्याचा सर्वांगीण विकास होऊन समाजास फायदा होऊ शकतो असे मत डॉ.सबतकुमार डीग्गल यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून मांडले.

डॉ सुहास धांडे , (इंदोर), सीए. विवेक कटधरे (जळगाव )डॉ. मधुलिका सोनवणे (जळगाव ),डॉ. पवित्रा पाटील (जळगाव),  हे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील होते  प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी  आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच संस्थेच्या वतीने मान्यवराचे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत वाणिज्य व व्यस्थापन  विभाग प्रमुख तसेच संयोजक प्रा.सी.आर.देवरे यांनी सांगितले की, आजच्या राष्ट्रीय चर्चासत्रास देशभरातून 106 शोधप्रबंध सादर झालेले आहेत सदर शोधप्रबंध जॉईस केअर लिस्ट ह्या मानांकित प्रकाशना मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे आजच्या राष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट पेपर सादर करणाऱ्या 3 शोध निबंधकांना  बेस्ट आवर्ड इटाटमस 2020 देण्यात आला.

आपल्या या भाषणात प्राचार्य  डॉ.डी.एस सूर्यवंशी म्हणाले की यापूर्वी आमच्या महाविद्यालयाने 2017 मध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी 2020 मध्ये देखील आम्ही सर्वसमावेशक विषयाची निवड करून ह्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे आपणासर्वांमुळेच राष्ट्रीय चर्चासत्र पूर्णता यशस्वी झाला. मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो

राष्ट्रीय चर्चासत्रात सीए प्रा.विवेक कटधरे म्हणाले या अश्या चर्चा क्षेत्रामुळे शोधनिबंधकांच्या व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या अनुभवाच्या, विज्ञानाच्या फायदा देखिल समाजाला होतो. या चर्चासत्राच्या उद्देश म्हणजे प्राध्यापकांना आपले ज्ञान व अनुभव मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळते

अध्यक्षीय भाषणात एड. संदीप पाटील म्हणाले की, जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर कार्यरत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी, वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उच्चस्तरीय व निम्न स्तरावरील रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत. आगामी काळात आम्ही आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असून आपले सर्वांचे सहकार्य आम्हाला मिळेलच अशी अपेक्षा करतो.

सदर चर्चासत्रासाठी संस्थेचे उपप्राचार्य डॉ. ए एल. चौधरी, डॉ.व्ही.टी पाटील, प्रा. एन.एस.कोल्हे, डॉ.के.एन. सोनवणे समन्वयक प्रा.ए. एच.साळुंखे , सहा.समन्वयक प्रा.पी.आय जैन  प्रा.डॉ .शाम साळूखे ,(शेंदूरणी), डॉ.शैलेश वाघ , प्रा. कुणाल सोनार, प्रा.के.व्ही.शेलार, प्रा.पी पी कासार, वाय पी पाटील ,सी.जी.महाजन, पी.डी. महाजन, प्रियंका अग्रवाल तसेच वाणिज्य व व्यवस्थापन  विभागातील विदयार्थ्यांनी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए. बी.पटले, आभार प्रदर्शन परिषद सचिव प्रा.आर.पी.जैयस्वाल यांनी केले.

Exit mobile version