Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा ते जळगाव रस्ता दुरूस्तीचे भूमिपूजन

चोपडा प्रतिनिधी । चोपडा ते जळगाव रस्ता दुरूस्तीचे भूमिपूजन अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, संपर्क प्रमुख सुधीर गडकरी, जळगाव बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील, माजी महापौर राखी सोनवणे, नगरसेविका लता सोनवणे, जिल्हा परिषद गोपाल चौधरी, हरीश पाटील, उपसभापती एम. व्ही. पाटील, भरत बाविस्कर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, नगरसेवक महेश पवार, महेंद्र धनगर, किशोर चौधरी, संध्या महाजन, प्रकाश पाटील, आबा देशमुख, गोपाळ चौधरी, दीपक चौधरी, प्रदीप बारी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी मकरंद अनासपुरे म्हणाले की, आयुष्यात राजकारणी व्हावे असे वाटले नाही. कारण त्यात सर्वच चांगली लोक नसतात. राज्यात तीन वर्षात नाम फाउंडेशनने पूर्ण महाराष्ट्रात मोठे काम उभे केले आहे. खडकवासल्याचे गाळ काढण्याचे कामदेखील नाम फाउंडेशन करत आहे. राजकारणी माणूस जेव्हा समाजकारण करायला लागेल तेव्हा त्यांचे जनता अभिनंदन केल्याशिवाय राहणार नाही. गणपतराव देशमुख यांच्यासारखे आदर्श राजकारणी माणसे राजकारणात कमी आहेत. माणसांनी माणसासाठी चालवलेली ही मोहीम म्हणजे नाम फाउंडेशन असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, येत्या अधिवेशनात आपण खेडीभोकरी ते भोकर पूल देखील मंजूर करणार आहोत. तर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version