Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांचा सत्कार

 चोपडा, प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले जिल्हा  दौऱ्यावर आले असता अमळनेर येथे काँग्रेस  कार्यकर्त्यांच्या व किसान रॅलीत त्यांचे आगमन झाले असता चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. 

 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व किसान किसान रॅलीचे  चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.   याप्रसंगी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष  डी. चौधरी सर, चोपडा शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया कांतीलाल सनेर ,चोपडा शहर  तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एन. एस. यु .आय. राज्य सचिव  चेतन बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे चोपडा येथील कार्यकर्ते, जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष  ॲड.संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, नंदकिशोर सांगोरे,  राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, फातिमा जागीरदार , देवकांत चौधरी, आरिफ शेख, इलियास पटेल, ॲड. एस. डी. पाटील, रमाकांत सोनवणे, सय्यद साहेब आदी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

Exit mobile version