Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा उपजिल्हा रूग्णालयास १५ व्हेंटीलेटर; आमदार लताताई सोनवणे यांचे प्रयत्न

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेणार्या कोविड संशयीत रूग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी म्हणुन उपजिल्हा रूग्णालयासाठी १५ व्हेंटीलेटर उपकरणे मिळाली आहेत.

येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी पुरेशा प्रमाणात व्हेंटीलेटर पुरवावे अशी मागणी आमदार लताताई सोनवणे यांनी वेळो वेळी शासना कडे केली होती. त्या नुसार कोविड रूग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने १५ व्हेंटीलेटर आज चोपडा उपजिल्हा रूग्णालयास दिले. याला आमदार लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रूग्णालयाकडे सुपुर्द करण्यात आले.

या प्रसंगी राजेंद्र पाटील, हरिश पाटील, जि. प. सदस्य एम.व्ही.पाटील, अ‍ॅड. एस.डी.सोनवणे, तहसिलदार अनिल गावित, उपजिल्हा रूग्णालय अधिक्षक डॉ. मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप लासुरकर, गट विकास अधिकार बी.एस.कोसोदे, भरत बाविस्कर, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नगरसेवक महेंद्र धनगर, सुकलाल कोळी, तालुका संघटक दिपक चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी, युवासेना तालुका प्रमुख सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version