चॉपरसह रेकॉर्डवरील संशयीताला एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील के सेक्टर येथील एचडी फायर कंपनी जवळून लोखंडी चॉपरसह रेकॉर्डवरील संशयीताला मंगळवार ३ मे रोजी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश शंकर चौधरी (वय १९, रा.सम्राट कॉलनी,जळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील के सेक्टर येथील एचडी फायर कंपनी जवळ मंगळवारी रेकॉर्डवरील संशयित शैलेश चौधरी हा लोखंडे चोपर बाळगून असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सय्यद योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील ,छगन तायडे यांच्या पथकाने संकेत शैलेश चौधरी यास अटक केले त्याच्याकडून चोपर जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शैलेश चौधरी यांच्या विरोधात यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Protected Content