Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चेअरमन प्रतिनिधी म्हणून झालेली निवड गौरवास्पद : संजय देशमुख

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथिल जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी संस्थेवर चेअरमन प्रतिनिधी म्हणून जळगाव येथील संजय भा. देशमुख यांची नियुक्ती केली आहे.

नुकतीच संजय देशमुख यांनी संस्थेचे अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयात भेट दिली व संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉ. व्ही. आर.पाटील यांनी स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला. संस्थेचे जेष्ठ संचालक यु. यु. पाटील अध्यक्ष म्हणून कार्यक्रमात उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना संजय देशमुख यांनी संस्थेबद्दल व संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल गौरव उद्गार काढले व अश्या संस्थेवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरुड,सचिव सागरमल जैन,जेष्ठ संचालक यु. यु. पाटील, सहसचिव दीपक गरुड, व संचालक मंडळाचे ऋण व्यक्त केले. तसेच संस्थेच्या आदर्श लौकिकात भर घालण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषणात यु. यु. पाटील यांनी संजय देशमुख यांच्यामुळे संस्थेच्या सुरू असलेल्या उपक्रमात आणखी नवीन उपक्रमांची भर घातली जाईल यात शंका नसल्याचे सांगितले. सोशियल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, व कार्यालयीन कर्मचारी यांनी संजय देशमुख यांचे स्वागत केले.

Exit mobile version