Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुंचाळ्यात गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चुंचाळे हे गाव श्री संमर्थ सुखनाथ बाबा यांची तपोभुमी व रघुनाथ बाबा यांची जन्मभुमी तसेच श्री संमर्थ वासुदेव बाबा यांची कर्मभुमी या पावन भुमीत दि १३ रोजी गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा उत्सहात साजरा करण्यात आला.

 

गुरु शिष्य पुण्यतिथीनिमित्ताने दर्शनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकासाठी चुंचाळे फाटा ते चुंचाळेपर्यंत दरबारातील गाडीव्दारे मोफत सेवा पुरविण्यात आली. यावेळी भाविकानी मानलेले नवस फेडण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी व सध्या जाणवत आसलेले संकट पाणी यासाठी होमहवन करुन वरुण राजाला साकडे घालण्यात आले. राज्यातून विविध ठिकाणाहुन आलेल्या हजारो भाविकांनी बाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्ताने भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराच्या माध्यमाने सामाजिक एकतेचे दर्शन घडले. रक्तदत्यांमध्ये २१ पैकी १० जण हे आदिवासी तडवी बांधव होते. दरम्यान, श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात ७ क्विंटल च्या पुरणपोळी व आंब्याच्या रसाच्या भोजनाचे कार्यक्रम हे बाबांच्या भाविक शिष्यगणानी व ग्रामस्थानी केले होते.

असा झाले विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळी सहाला समाधी तर सातला मारोती स्नान, आठ पासुन ते दुपारी १२ ते १ आरती, भजन व भारुडे, दुपारी १ ते रात्री ७ पर्यत महाप्रसादाची वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी श्री संमर्थ वासुदेव बाबा शिष्य व चुंचाळे येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चौधरी , दिपक नेवे, विक्की वानखेडे , नितिन बडगुजर यांनी परिश्रम घेतले तर रक्तदान शिबीरा ठीकाणी संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल , प्रदेश संघटक सुनिल गावडे , विभागीय उपाध्यक्ष महेश पाठील यांनी आपली उपस्थिती दिली.

Exit mobile version