Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुंचाळे येथील शेतमजूराची गळफास घेऊन आत्महत्या

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   तालुक्यातील चुंचाळे गावात एका शेतमजूर तरुणाने शेतातील झाडास गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.  याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चुंचाळे येथील रहिवाशी  सतीष शेनफडु पाटील (वय३५ वर्ष)  हा तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सतीश याने  आज सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ते १ वाजेच्या दरम्यान साकळी शिवारातील उज्जैनसिंग राजपुत यांच्या शेतातील बांदावरील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. याबाबतची माहीती मोहराळा येथील शेतकरी हे जात असतांना त्यांच्या निर्दशनास ही घटना आल्याने त्यांनी गावात ही माहीती गावकऱ्यांना दिली . मयत पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे . दरम्यान शेतमजुर सतिष पाटील यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुली व एक मुलगा, आई , वडील असा परिवार आहे. सतीश यांने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या संदर्भात मयताचे भाऊ योगेश कृष्णा पाटील यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 

Exit mobile version