Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुंचाळे येथील क्षेत्रभेटीत मोह वृक्ष संगोपन मार्गदर्शन

चोपडा : प्रतिनिधी  । जिल्हा तेल संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रलशर प्लांटो.बायोटेक प्रा.ली.चे संचालक निखिल चौधरी यांनी चुंचाळे येथे मोह वृक्ष लागवड पथदर्शक प्रकल्प बागेस भेट देऊन क्षेत्रभेटीच्या उपक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी तेलबिया संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ एस सी पाटील.यांनी प्रगतशील शेतकरी महाजन यांच्या प्रकल्पास भेट देऊन मोह वृक्षा पासून उत्पादित तेलबिया टोळंबी पासून तयार झालेले तेलाचे बाजारपेठेतील मागणी व विविध उपयोग तेलाच्या विकासा संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की , मोह वृक्ष कायमस्वरूपी आर्थीक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना वरदान ठरणार असून इतरही फळबागा प्रमाणे संगोपन केल्यास नैसर्गिक तेलाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकते या वृक्षापासून फक्त तेलच मिळत नाही तर पेंड सुद्धा सेंद्रिय शेतीसाठी उत्तम खत म्हणून उपयोगी आहे बियांचे टरफलापासून औद्योगिक क्षेत्रात काजू बियांच्या टरफले प्रमाणे उपयोग होऊ शकतो

झाडापासून मिळणाऱ्या चिकाचे उपयोग रंग व साबण उद्योगात चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे मत चौधरी यांनी व्यक्त केले. प्रयोगशील शेतकरी म्हणून श्री महाजन यांचे डॉ.पाटील व उद्योजक चौधरी यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version