Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनला आता ब्रुसेलोसिस आजाराचा विळखा

बीजिंग: वृत्तसंस्था ।कोरोनानंतर आता चीनमध्ये ब्रुसेलोसिस आजाराचा संसर्गात धोका वाढत आहे. चीनमधील अनेक राज्यांमध्ये बाधित नागरिकांची संख्या वाढत आहे. या आजारासाठी मागील वर्षी एका औषध कंपनीत झालेली वायूगळती यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनमधील गांसू, शाक्सनी आणि इनर मंगोलिया आदी राज्यांमध्ये ब्रुसेलोसिस आजाराची प्रकरणे आढळली आहेत. तज्ञांनुसार हा आजार काही वर्षांपर्यंत राहू शकतो. या विषाणूच्या बाधेमुळे होणाऱ्या आजारात व्यक्तिला ताप, सांधेदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे दिसतात. सप्टेंबर महिन्यात लहान मुलांच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात पाच बालकांना या आजाराची बाधा झाली होती.

साधारणपणे हा आजार गुरं, शेळ्या, डुक्कर आदींच्या मार्फत फैलावतो. प्राण्यांना या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी लस देण्यात येते. या आजाराचा जीवाणू मानवाच्या थेट संपर्कात आल्यास बाधा होण्याचा धोका आहे. हा आजार बरा होऊ शकतो. मात्र, वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे

उत्तर-पश्चिम चीनमधील झॉनगुम लॅन्झूमध्ये प्राण्यांसाठी लस निर्मिती करणाऱ्या शासकीय औषध निर्मिती कंपनीमध्ये मागील वर्षी वायू गळती झाली होती. या कंपनीमध्ये प्राण्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या ब्रुसेलोसिस या लस निर्मितीसाठी मुदत संपलेल्या कीटकनाशकांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे वायू गळती झाली होती. परिसरात पसरलेल्या वायूत रसायने आणि एरोसोल्सही होते. त्यामुळेच परिसरातील हवेत आजार पसरला. या अपघाताच्या काही महिन्यानंतरही त्याचे परिणाम जाणवत आहेत.

Exit mobile version