Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनने लडाख सीमेवरून ९० टक्के सैनिकांना बोलावले माघारी; थंडीमुळे प्रकृती खालावली

 

 

बीजिंग : वृत्तसंस्था । लडाख परिसरातील वाढत्या थंडीमुळे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० टक्के सैनिकांना परत पाठवले आहे.

 

पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले होते. त्यानंतर तिथल्या थंडीमुळे सैन्य माघे बोलवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीनंतर चीनने लडाखच्या पूर्वेकडील भारतीय हद्दीजवळ जवळपास ५०,००० सैन्य तैनात केले होते.

 

चीनने गेल्या वर्षी तैनात केलेल्या सैनिकांना परत पाठवण्यात आलं असून त्या जागी आजूबाजूच्या परिसरातील नविन सैन्य तैनात करण्यात आलं आहे. गेल्यावर्षीच्या सैन्यातील ९० टक्के सैनिकांना परत बोलावण्यात आलं आहे. वाढलेल्या थंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अनुकूल नसल्याने हे माघारी बोलावण्यात आलं आहे. पँगाँग लेक क्षेत्रात तैनात असतानाही पीपल्स लिबरेशन आर्मी जवळजवळ दररोज त्यांच्या चौक्यांवरील व्यक्तींची माघारी पाठवून दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येत होती.

 

पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या उंच भांगामध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेणी थंडी पडते. त्यामुळे सैन्य थोड्या थोड्या काळाने खाली बोलावले जाते. दोन वर्षांपासून भारतीय सैन्यदेखील उंच भागात तैनात करण्यात येत आहे. दर वर्षी सुमारे ४०-५० टक्के सैनानिक खाली बोलावले जातात. अतिशय कठीण अशा परिस्थितीत आयटीबीपीच्या सैनिकांना कधीकधी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तिथे थांबावे लागते.

 

गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर गेल्या वर्षी एप्रिल-मेपासून भारत आणि चीनने पूर्व लडाख आणि वास्तविक नियंत्रण रेषेच्या इतर भागात प्रचंड सैन्य तैनात केले होते. या वर्षाच्या सुरूवातीस, दोन्ही देशांनी पँगाँग तलाव क्षेत्रात आपले तैनात केलेले सैन्य मागे घेण्याचे व तेथील गस्त थांबविण्याचे मान्य केले. मात्र तरीही त्या परिसरात अद्याप सैन्याच्या तुकड्या गस्त घालत आहेत.

 

भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे वारंवार लडाख सेक्टरला भेट देत आहेत आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी सैनिकांना मार्गदर्शन करत असतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह चायना स्टडी ग्रुपही परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सूचना देत असतात आणि चीनशी चर्चेदरम्यान मार्गदर्शक सूचना करत असतात.

 

Exit mobile version