Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनचा घुसखोरीचा डाव उधळला

नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीनच्या नाकुला भागातून घुसखोरी करण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. आपल्या जवानांनी चीनी सैनिकांना मारहाण करून मागे जाण्यास भाग पाडले आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनी सैन्याने पूर्व लडाख सीमेजवळ अतिक्रमण करण्याचा प्रयत्न फसला होता. यानंतर आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.

Exit mobile version