Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिमुकल्या भगिनींनी केली कोरोनावर मात

जळगाव, प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या चिमुकल्या भगिनीं कोरोनावर मात करून घरी परतल्या आहेत. 

जामनेर तालुक्यातील ह्रुदयी दिपक मोरे (वय ४ वर्ष)  व  माही दिपक मोरे (वय ७ वर्ष)  या भगिनींची कोविड तपासणी पॉझिटीव्ह आढळल्याने उपचारार्थ त्यांच्या आई सोबत दि. २९ एप्रिल २०२१ रोजी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे  दाखल झाल्या होत्या.  सेंटरमध्ये संवेदनशील मनाने कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांनी केलेल्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत दोघी चिमुकल्या त्यांची आई शितल दिपक मोरे यांच्यासोबत उपचार घेऊन सुखरूप घरी गेल्या.  दररोज सकाळी योगा करतांना चिमुकल्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मनोरंजन, बडबड गीते, धमाल गोष्टी सांगत.  कोविड केअर सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण न ठेवता चिमुकलीनी सर्वाची मने जिंकत आपलेसे करून घेतले. उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जातांना सर्वांना कोरोना विरुद्धच्या लढाईची नवी उमेद देत निरोप घेतला.

 

Exit mobile version