चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सश्रम कारावास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या साडेचार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने गुरुवार २१ जुलै रोजी दुपारी सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी साडेचार वर्षाची चिमुकलीवर शेजारी आरोपी रवींद्र पुन्हा रंधे व 61 या वृद्धाने चिमुकलेला घरात बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना १५ मार्च २०२० रोजी घडली होती. या संदर्भात पीडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी म्हणून रवींद्र रंधे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा खटला जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी.वाय. काळे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या साक्षीच्या आधारे रवींद्र रंधे याला दोषी ठरवत त्याला २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष  सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून गणेश नायकर यांनी सहकार्य केले.

 

Protected Content