Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये शिरुन तेथे झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर लैंगित अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा न्यायालयाने २० वर्षाचा सश्रम कारावास आणि ७५ हजार रूपयांचा दंड सुनावली आहे.राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-२२, रा.जळगाव) असे नराधमाचे नाव आहे.

 

जळगाव शहरातील एका भागात आपल्या पालकांसह चिमुकली शेडमध्ये वास्तव्याला होती. १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी राणासिंग जुन्नी याने घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने शेडच्या दरवाजाची आतील कडी हाताने उघडून त्याने शेडमधील मोबाईल चोरले. तसेच याठिकाणी झोपलेली ४ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत, एका निर्जळ ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीतेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन १८ ऑक्टोबर २०१८ रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित राणासिंग जुन्नी याला अटक करण्यात आली होती.

जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीतेसह तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. मंगळवारी या खटल्यान निकालावर कामकाज झाले. न्या.ठुबे यांनी आरोपी राणासिंग जुन्नी याला दोषी ठरवत भादवि कलम ४६१,३८० आणि बाललैंगिक अधिनियम २०१२ चे कलम ४ ब नुसार दोषी धरुन नराधामास २० वर्ष सश्रम कारावास व ७५ हजार रुपये दंड तो न भरल्यास अडीच वर्षाची साधी कारावासाची शिक्षा. तसेच ७५ हजार दंडाच्या रकमेतून पिडीतेला ७० हजार द्यावे. तसेच भादवि कलम ४६१ साठी १ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ३ महिने साधी कारवासाची शिक्षा, भादवि कलम ३८० नुसार ३ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version