Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिनावल बनले पीक चोरी व नुकसानीचे हॉट-स्पॉट; पुन्हा केळीचे १ हजार खेडे कापून नुकसान

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील चिनावल परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पीक चोरी व केळी कापूर नुकसान करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे चिनावल परिसर हे ‘पीक चोरी व नुकसानी’चे हॉटस्पॉट ठरत आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चिनावल शिवारातील अरविंद भास्कर महाजन यांचे शेतात कमलाकर नारायण भारंबे यांनी केळीची लागवड केली आहे. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील १ हजार केळीच्या खोड कापूनसुमारे ४ लाख रूपयांचे नुकसान केले आहे. या मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी चिनावल पोलीस चौकात धाव घेवून पोलीस अधिकारी यांना घेराव घालून शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल केला. दरम्यान गावात तणावाची स्थिती उद्भवू शकते, यासाठी पोलिस प्रशासनाने स्थानिक पोलीससह दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करुन गावात बंदोबस्त लावला, गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे.

दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी तरूण शेतकऱ्यांना अज्ञात चोरट्यांनी पीक चोरतांना मारहाण केली होती. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतातील ४० ते ५० घड कापून नुकसान केले. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच त्याच रस्त्यावरील कमलाकर भारंबे यांनी लागवड केलेल्या केळी बागातून १ हजार केळी खोंडे कापून नुकसान केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरून शेतकरी सामूहिक रित्या चिनावल येथे रस्त्यावर उतरून पोलिस मदत केद्रा सममोर मोठ्या संख्येने जमा होत संताप व्यक्त करीत न्याय देण्याची मागणी केली.

घटनेचे गांभीर्य ओळखत मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लवाण, सावदा पो.स्टे.चे स.पो.नि.देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली नुकसानी ची पाहणी करून चिनावल येथील मराठी शाळेत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर संतप्त भावना व्यक्त केल्या. श्रीकांत सरोदे नुकसानग्रस्त शेतकरी कमलाकर भारंबे , तुषार महाजन , गोपाळ नेमाडे , चंद्रकांत भंगाळे , माजी सरपंच योगेश बोरोले , कुंदन पाटील यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास बद्दल माहिती दिली. ज्याच्याकडे जमीन नाही, चाऱ्याची व्यवस्था नाही विषेष म्हणजे जे बाहेर गावाहून गावात राहायला आलेले लोक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात मध्ये आपली गुरे चारतात. केळी घड चोरुन नेतात, कोणी शेतकऱ्यांने हटकल्यास मारहाण करतात. ह्या त्याच्या दादागिरी मुळे शेतकऱ्यांना त्याच्याच शेतात जाण्यास घाबरावे लागत आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून अशा उपद्रवी चोरट्यांचा बंदोबस्त होणार की नाही असा सवाल केला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लवाण ,एपीआय इंगोले यांनी शेतकऱ्यांना सदर चोरट्यावर गुन्हे दाखल केले जातील आपण आम्हाला माहिती द्या अशा लोकांना तडीपार ची सुद्धा कारवाई आम्ही करु , गावात ग्राम सुरक्षा दल स्थापून आमचा १ पोलिस अधिकारी व चार पोलिस कर्मचारी त्यांचे सोबत राहू अशी विनंती केली. दरम्यान नेहमीच शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो त्यातच ही मानव निर्मित दहशती मुळे शेतकरी भयभीत झाले आहे आजच्या या केळी खोड कापून केलेल्या नुकसानी ने शेतकऱ्यांनचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुरता खचला आहे या पुढे तरी पोलिस प्रशासनाने परिसरातील पिक संरक्षण संस्था व पिक चोरी संदर्भात तक्रार घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिस स्टेशन ला सन्मान देवून तक्रार दाखल करून घ्या , दोषी ना पाठीशी घालू नका या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

आज झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी कमलाकर भारंबे यांनी सावदा पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून यात निखिल कमलाकर भारंबे व कमलाकर नारायण भारंबे यांचे सुमारे ४ लाख रुपयांची नोंद करण्यात आली असून हे नुकसान करणाऱ्या अज्ञात ईसमा विरुद्ध रजि.न. न्वये भादवि कलम ३७९ ,४२७ , गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या बाबत सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि देविदास इंगोले ,पो.उप.निरिक्षक राजेंद्र पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली हे.का.पोहेकर व त्यांचे सर्व सहकारी तपास करीत आहे. दरम्यान नुकसानी चां पंचनामा महसूल विभागाचे मडळाधिकारी जे डी.भगाळे , तलाठी लिना राणे यांनी करुन वरीष्ठ स्तरावर पाठवला आहे. तसेच चिनावलमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

या वेळी चिनावल पिक संरक्षण संस्था तर्फे ही दोषी वर कारवाई चे निवेदन देण्यात आले आहे याचं अनुषंगाने सध्या ४ वाजता चिनावल , खिरोदा ,रोझोदा कोचूर येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत फैजपूर उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर चे अधिकारी कैलास कडलग यांना या नुकसानी व गुन्हेगारी चां बंदोबस्त करण्याच्या मागणी चे निवेदन देण्यात आले यात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास परिसरातील शेतकरी कोणतताही शासकीय कर भरणार नसल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान १९ रोजी शेतकरी मारहाण प्रकरणात आरोपी रामा शामराव सपकाळे , प्रकाश शामराव सपकाळे , अनिता रामा सपकाळे यांना अटक करण्यात आली आहे. चिनावल, सावदा पोलिस स्टेशन व फैजपूर येथे परिसरातील शेतकरी सर्वश्री श्रीकांत सरोदे , गोपाळ नेमाडे , पोलिस पाटील निलेश नेमाडे , माजी सरपंच योगेश बोरोले , चंद्रकांत भंगाळे ,राजेश महाजन ,सूरज भारंबे , विनायक म हाजन , ठकसेन पाटील पंकज नारखेडे क,ल्पेश नेमाडे ,बापू पाटील , योगेश महाजन संदिप महाजन , दिनेश महाजन ,हितेश भंगाळे ,कोचूर येथील पंकज पाटील , कमलाकर पाटील ,रोझोदा येथील भरत लिधुरे , चंद्रकांत गारसे स्वप्निल पाटील , मिलिंद भंगाळे , हितेश भंगाळे , तुषार महाजन ,अशोक महाजन ,परेश महाजन ,सागर भारंबे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version