चिनावल ग्रामस्थांनी मुख्य अभियत्यांसमोर समस्यांचा वाचला पाढा !

चिनावल ता. रावेर- जितेंद्र कुळकर्णी । गेल्या अनेक दिवसांपासून रावेर तालुक्यातील चिनावल गावठाण व विज उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या शेत शिवारात ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विज समश्याना सामोरे जावे लागत आहे,  चिनावल येथील संतप्त ग्रामस्थांनी थेट सावदा गाठत मुख्य उपअभियंता राजेश नेमाडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

 

याप्रसंगी माजी सरपंच अध्यक्ष योगेश बोरोले, गोपाळ नेमाडे, श्रीकांत सरोदे, नरेंद्र पाटील, भास्कर सरोदे, उपसरपंच परेश महाजन, संदिप महाजन, सुनिल गाजरे, हितेश भंगाळे, अनिल किरगे, दिलिप भारंबे, टेनू नेहते आदी उपस्थित होते.

 

यावेळी मुख्य अभियंता समोर गावात दिवसभरात अनेक वेळा विज बंद राहणे ,विज खंडीत करणे ,चिनावल उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या शेती शिवारात वारंवार विज समश्यामुळे विज बंद रहात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणे, गावातील लहान मोठे उद्योग व्यवसाय, सेतु सुविधा केंद्र, गावातील पाणी पुरवठा या सर्व बाबी वर याचा मोठा परिणाम झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष आहे गावात विजेच्या लपंडाव व समश्ये मुळे काही उद्रेक होण्या आधी संबंधित अधिकारी , कर्मचारी नी कामात सुधारणा करावी अन्यथा १० दिवसांनंतर निवेदन नाही तर आक्रमक पवित्रा घेतील असा इशारा या वेळी निवेदन देताना ग्रामस्थांनी दिला.

Protected Content