जळगावात चित्रकार पंकज वानखेडे यांच्या विलोभनीय निसर्ग चित्रांचे प्रदर्शन (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवा चित्रकार पंकज वानखेडे यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन दि.२ ते १४ जून २०२२ पर्यंत पु.ना.गाडगीळ आर्ट गॅलरी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

चित्रकार पंकज नारखेडे हे धनाजीनाना विद्यालय खिरोदा येथे कला शिक्षक आहेत. ते इंदौर देवलालीकर सोलगेगावकर यांचा वारसा जोपासणारे व स्व. गुलझार गवळी व प्रकाश तांबटकर यांचे शिष्य आहेत. जळगावात दि. २ ते १४ जूनपर्यंत चित्रप्रदर्शनाचे पु.ना.गाडगीळ आर्ट गॅलरीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून बुधवारी बंद राहणार आहे. या चित्रप्रदर्शनात ५७ लॅन्डस्केप चित्रांचा समावेश आहे. यात सातपुडा परिसरातील सुंदर असे रेखाटन करण्यात आले आहे. चित्रकार पंकज वानखेडे यांच्या चित्रांचे आतापर्यंत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, अकोल येथील कालिदास कलाभुवन, मुंबईत नेहरू सेंटर, आर्ट प्लाझा गॅलरी येथे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. निसर्गचित्र व व्यक्तिचित्र हा त्यांच्या चित्रकलेचा मुख्य विषय आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य, तेथील निसर्ग, आदिवासी समाज, संस्कृतीचे मंत्रमुग्ध करणारे सुंदर रेखाटन करणे.  जिल्ह्यातील रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन चित्रकार पंकज वानखेडे यांनी केले आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/561855518850777

 

Protected Content