Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चितोडा येथे महाशिवरात्रीच्या निमिताने जंजाळ कुटुंबातर्फे भंडाऱ्याचे आयोजन

44

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चितोडा गावात आज सकाळ पासुन महाशिवरात्रीचे औचित्य साधुन जंजाळ कुटुंबाच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील मोठया उत्साहाच्या वातावरणात महाराजांचे प्रवचन आणि गाव भंडाऱ्याचे ( महाप्रसादाचे ) कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावल तालुक्यातील चितोडा गावात यावल एसटी आगारामध्ये सेवेत कार्यरत असलेले जी. पी. जंजाळ यांच्या कुटुंबाच्या वतीने मागील आठ वर्षापासुन सालाबादप्रमाणे स्वखर्चाने महाप्रसाद गाव भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पाच हजार लोकवस्ती असलेल्या संपुर्ण गावाला जेवण देण्यात येते. संपूर्ण गाव भंडाऱ्याचा महाप्रसादाचा खर्च जंजाळ कुटुंबीयाकडुन करण्यात येते. याप्रसंगी काल शिवमंदीरात जंजाळ कुटुंबातील जी. पी. जंजाळ , शारदा जंजाळ , गीता जंजाळ आणि मुंबई येथे पोलीस सेवेत असलेले अर्जुन जंजाळ्यांच्या हस्ते शिव प्रतिमेची पुजाअर्चा करण्यात आली.

Exit mobile version