Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंतामण मोरया परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

धरणगाव, प्रतिनिधी । येथील चिंतामण मोरया परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होतांना दिसून येत आहे. याठिकाणी दोन गाड्या चोरीस गेल्या असून घराबाहेर झोपलेल्या नागरिकांचे मोबाईल सुद्धा चोरांनी लंपास केले आहेत.

धरणगाव येथे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. यात चिंतामण मोरया परिसरात चोरीची प्रमाण वाढले आहे. मागील पंधरादिवसांत दोन गाड्या व मोबाईल चोरण्याचा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्री पोलिसांनी दोन वेळेस गस्त घालावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Exit mobile version