Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : मुख्यमंत्र्यांचे कोरोना रूग्णांसाठी रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, लष्कराला साकडे

मुंबई वृत्तसंस्था । राज्यासह देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यशासन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. चाचण्यांचा वेगही वाढवल्याने रूग्ण संख्या वाढत आहे. राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर व इतर केंद्र शासनाच्या आखातरित्या रूग्णालय व संस्थानी त्यांच्या राज्यभरात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले आहे.

राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर तसेच इतर केंद्र शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये आणि संस्था यांनी त्यांच्या राज्यभरात सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.

सध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे. पण केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जे. जे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकुल इत्यादी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे.

तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये आणि मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्या राज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे तसेच परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल.

Exit mobile version