Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन पोलिस पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई/पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत. दरम्यान, कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

 

पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना संबंधित वाहतूक पोलिसाची प्राणज्योत मालवली. आतापर्यंत पुण्यात दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे ‘कोरोना’मुळे दुर्दैवी निधन झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 15 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या मुंबईत आतापर्यंत 11 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. पुण्यात दोन तर नाशिक आणि सोलापूरमध्ये प्रत्येक एक पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Exit mobile version