Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : मंत्रालयातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रालयातील सफाई कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

मंत्रालयातील काही कर्मचारी एका सफाई कामगाराच्या संपर्कात आले होते. यातील तिघांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. संपर्कात आलेल्या तिघा कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मंत्रालयात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक मालेगाव, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. तशात मंत्रालयात कोरोना पोहोचल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version