Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज १५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

 

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज (गुरुवार) प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर ७, चोरगाव ३, साळवा, कल्याणे खुर्द, पथराड, आनोरे आणि पाळधी खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर, गणेश नगर,साहिल नगर,महावीर नगर, वाणी गल्ली, गणाबाप्पा नगर, लोहार गल्लीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच चोरगाव ३, साळवा, कल्याणे खुर्द, पथराड, आनोरे, पाळधी खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३१५ झाली आहे. तर १०० रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत १९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २१ जण मयत झाले आहेत. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Exit mobile version