Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले १० कोरोना पॉझिटिव्ह

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आज पुन्हा १० नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यात धरणगाव शहरातील ३ तर पाळधी खुर्द ५, झुरखेडा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

आज सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यात पुन्हा १० नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील मराठे गल्ली २, बेलदार मोहल्ला १, झुरखेडा २ तर पाळधी खुर्द येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या १० रूग्णांमुळे तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १७७ इतकी झाली आहे. यातील १६ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १०४  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३८ अहवाल प्रलंबित आहेत.

Exit mobile version