Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक…! धरणगावात पुन्हा आठ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; अर्धशतकाकडे वाटचाल

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या अहवालापैकी आठ संशयित रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. धरणगाव तालुक्यातील कोरानाबाधित एकुण रूग्ण संख्या ४२ वर पोहचली आहे. या वृत्ताला तहसीलदार नितीन देवरे यांनी दुजोरा दिला आहे.

धरणगाव कोवीड केअर सेंटरने क्वारंटाईन केलेल्या कोरोना संशयितांचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज तपासणी अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यात तालुक्यातील आठ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. काल रात्री उशीरापर्यंत एकुण रूग्ण संख्या ३४ होती. आज ८ रूग्ण कोरानाबाधित आढळून आल्याने एकुण ४२ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहे. आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आढळून आलेले रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती व रहिवास असलेला परिसर यांची माहिती घेवून परिसर सील करण्याचे काम आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तहसीलदार नितीन देवरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Exit mobile version