Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : देशात एका दिवसात २१५४ नवे रुग्ण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत देशात २१५४ कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 16 हजार 365 वर पोहोचली आहे. तर मृत्यूचा आकडा ५०७ झाला आहे.

 

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून एका दिवसात तब्बल 2 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद /आयसीएमआरने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात कोरोनाचे 2154 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 16 हजार 365 वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72,123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे देशातील २३ राज्यांमधील ४५ जिल्ह्य़ांत गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. अशा जिल्ह्य़ांचा बिगर हॉटस्पॉट श्रेणीत (नारंगी श्रेणी) समावेश केला जातो. पुढील १४ दिवसांमध्येही नवा रुग्ण न आढळल्यास हे जिल्हे करोनामुक्त मानले जातात.

Exit mobile version