Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंताजनक : कोरोनामुळे अमेरिकेत २४ तासांत २,००० लोकांचा मृत्यू !

 

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवर कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत बारा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत गेल्या २४ तासांत २,००० लोकांचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे

Exit mobile version