Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंचगव्हाण ग्रामपंचायत विभाजनासाठी गटविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चिंचगव्हाण ग्रामपंचायतीतून सुंदरनगर विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्थापित व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भातील विभाजनाचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी सादर केला आहे.  

तालुक्यातील चिंचगव्हान ग्रामपंचायतीतून सुंदरनगर विभाजन करण्यात यावे यासाठी ग्रामस्थांकडून वर्षानुवर्षे प्रयत्न केले जात आहे. मात्र प्रशासकीय स्तरावर याबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रशानाचा नाकर्तेपणा यातून दिसून येत आहे.  या विभाजनाच्या अभावामुळे अनेक समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील ही मुळ समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी. यासाठी आज मंगळवार,२ फेब्रुवारी रोजी चाळीसगावचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना विभाजनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याबरोबर खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिफारशी जोडले आहे. याप्रसंगी सरपंच सुभाष राठोड (पती), करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड तसेच चिंचगव्हान ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी मोरे आदी उपस्थित होते. 

Exit mobile version