Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव शहरात आरटीओ कार्यालय न झाल्यास खलाणे यांचा उपोषणाचा इशारा

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालूक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे यासाठी २६ जानेवारी या दिवशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव हरी खलाणे यांनी दिला आहे.

सन २००७ पासून भीमराव खलाणे सतत शासनाकडे पत्र व्यवहार करत आहे. परंतु २०२१ उजाडले तरी देखील त्यांच्या मागणीची प्रशासकीय स्तरावर दखल घेतली जात नसल्याने २६ जानेवारी या दिवशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा खलाणे यांनी दिला आहे. महसूलबाबत चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व पारोळा या चार तालुका मिळुन महिन्याला साडेपाच कोटी महसूल मिळत असतो. त्यामुळे शासनाचे नुकसान नाहीच तसेच तालुक्यापासून जळगाव हे शंभर किलोमीटर आहे. चाळीसगाव तालुक्यास दोन राज्यांची सीमा देखील जवळ आहे. रिक्षा मालक, ट्रक मालक या व्यावसायिक बांधवांना आरटीओच्या कामासाठी जळगाव येथे जावे लागते. तेथे गेल्यानंतर एका दिवसात काम होईल याची शाश्वती नसते. परंतु या गरीब व्यावसायिक बांधवाला त्या वाहनाचे पासिंग केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे २६ जानेवारीला जास्तीत जास्त लोकांनी उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन ही खलाणे यांनी केले आहे.

Exit mobile version