Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव शहरातून विवाहित महिला बेपत्ता

चाळीसगाव प्रतिनिधी । मैत्रिणीला भेटून येते असे सांगून बाहेर गेलेली तरूणी शहरातून बेपत्ता झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात हरवल्याचे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, कोमल रमेश चौधरी ( वय- २२ वर्षे रा. ठाकुरवाडी, हिरापूर रोड, चाळीसगाव) आपल्या आईवडिलांसोबत राहते. सन २०१८ साली कोमलचा लग्न झालेला आहे. घरातील कलहामुळे डिसेंबर २०२० मध्ये घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आपल्या आईवडिलांसोबत  राहत आहे. वडील रमेश निंबा चौधरी हे हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कोमल चौधरी हि १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान मी माझ्या मैत्रिणीला भेटून येते. असे सांगून ती घरातून बाहेर गेली. मात्र ती अद्यापपर्यंत घरी परतलेली नाही. म्हणून आई वैशाली रमेश चौधरी हिने शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.ना.२२३७ मुकेश पाटील हे करणार आहेत.

Exit mobile version