Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खा. उन्मेश पाटील हस्ते माल्यार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून खासदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

“शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे मुलमंत्र संपुर्ण जगाला देणारे असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधून खासदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाची साथ सुरू असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाचे नानासाहेब बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक नितिन पाटील, नगरसेविका सायली रोशन जाधव, नगरसेवक बंटी ठाकूर, जगदीश चौधरी,विजय जाधव, गौतम जाधव, देविदास जाधव, सचिन दायमा, नरेन काका जैन, आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा देत खा. उन्मेश पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्यात.

 

Exit mobile version