Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे ओमनी-दुचाकी अपघातात जवानाचा मृत्यू

dead body on track

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्टाकडून धुळेरोडवर दुचाकीला मागून ओमनीने जोरदार धडक दिल्याने सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाल्याची घटना 22 रोजी सायंकाळी घडली याप्रकरणी ओमनी चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मुंदखेडे येथील रहिवासी केंद्रीय राखीव पुलीस दलाचे जवान रविंद्र ओंकार गायकवाड (वय-36) ह.मु.धुळे रोड पुन्शी पेट्रोल पंप मागे चाळीसगाव श्रीनगरमध्ये कार्यरत होते. तीन दिवसापूर्वीच ते सुटीवर चाळीसगाव येथे आले होते.

22 रोजी सायंकाळी 7-30 वाजेच्या सुमारास त्यांची (एमएच 19 बीएच 8685) या मोटारसायकलवरून कोर्टाकडून धुळेरोडकडे जात असताना रेल्वे उड्डाण पुलाजवळ मागावून येणाऱ्या ओमनी क्र (एमएच 18 बीसी 7328) ने त्यांना मागावुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. नागरीकांच्या मदतीने समता सैनिक दलाचे पदाधिकारी धर्मभूषण बागुल यांनी जखमी रविंद्र गायकवाड यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. चाळीसगाव येथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी  धुळे येथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ओमनी चालक अनिकेत पोळ रा. पंचशील नगर याचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास उपनिरीक्षक महावीर जाधव करीत आहेत. जवान गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, अपंग वडिल व एक भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version