Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव कृषी बाजार समितीत शेतकरी मेळावा

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | इ- नाम योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना थेट विदेशी बाजारपेठ मिळावा यासाठी चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळावा आज घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.

केंद्र सरकारची राष्ट्रीय बाजार योजना व महाराष्ट्र सरकार पणन विभागा मार्फत राबविली जाणारी इ- नाम योजनेअंतर्गत शेतकरी व व्यापारी बांधवाच्या शेतमालाला थेट आंतरराज्य ते विदेशी बाजार पेठ मिळण्याची आधुनिक योजना माहितीबाबत २६ एप्रिल रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला बाजारपेठेत कशाप्रकारे सामोरे जाऊन फायदा करून घ्यावा याबाबत विस्तृत माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी दिली. याप्रसंगी सचिव सतिषराजे पाटील, दिनेश साहेबराव पाटील, महेंद्र सीताराम पाटील, भिमराण हरी खलाणे, ईश्वर प्रतापमग ठाकरे, भास्कर बाबुराव पवार, तुकाराम रामभाऊ पाटील, दगडु सुका दबके, बापू गीरधर चौधरी, डॉ. संदीप देशमुख, रमेश रघुनाथ सोनगीर, भिला मधुकर कण्डे, सरपंच संजीव राठोड (वलठान), ऍड. भरत राठोड, किरण राठोड व मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version