Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात मानवहित लोकशाही पक्षाचे एकदिवसीय आंदोलन (व्हिडिओ )

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने विविध मागण्या व दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

मानवहित लोकशाही पक्षातर्फे राज्यात आज विविध मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन होत आहे. याचाच भाग म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होत आहे. आंदोलकांची प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. लोक शाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू करणे, लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे, अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणे, १ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करणे, लहुजी साळवे अभ्यास आयोग शिफारस करणे, लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक संगमवाडी येथे होणे, अ ब क ड वर्गीकरणानुसार आरक्षण जाहीर करणे, बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करणे व गायरन जमीन गायरानधारकांच्या नावे करणे आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन होत आहे. 

याप्रसंगी तालुकाध्यक्ष गजानन श्रीपत चंदनशिव, तालुका संपर्क प्रमुख गोकुळ प्रसाद, तालुका ग्रामीण संघटक दिपक चांदणे, शहराध्यक्ष बापू कांबळे, समाजसेवक रविंद्र काळोखे, कवी शाहीर फासगे, कवी गौतम निकम, भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश नेतकर, सचिव युवराज राखुंडे, सामाजिक कार्यकर्ते नाना शिरसाट, दिपक मरसाळे, रवि मरसाळे आदी उपस्थित आहे.

 

 

Exit mobile version