Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात बॅनर हटाव मोहीम सुरू; सिग्नल पॉइंटला बॅनर लावण्यास मनाई

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील मुख्य चौकात बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण सुरू होते. सोबत अनेक बॅनर हे विनापरवाना लावले जात असल्याने चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाने आज अनाधिकृत बॅनर हटाव मोहीम हाती घेतली असून शहरातील सिग्नल पॉइंटसह मुख्य चौकातील विनापरवानाचे बॅनर काढण्यात आले

आज शहरातील बॅनर काढले असून सिग्नल पॉइंट सह मुख्य चौकात आता बॅनर ला परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक तुषार नकवाल यांनी दिली आहे. शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृत बॅनर लागत असल्याने शहराचे विद्रुपीकरण तर होतच होते शिवाय नगरपरिषद चा महसूल बुडून लाखो रुपयांचे नुकसान देखील होत होते नगरपरिषद चा महसूल वाढावा व अनाधिकृत बॅनर कोणी लावू नये म्हणून 12 रोजी नगरपरिषदचे आरोग्य विभागाचे तुषार नकवाल स्वच्छता निरीक्षक, विजय देशमुख, ईश्वर चव्हाण सुपरवायझर, अनिल निकम , विनोद जाधव यांनी बॅनर हटाव मोहीम हाती घेऊन शहरातील बॅनर काढण्यास सुरुवात केली, यापुढे सिग्नल पॉइंट सह मुख्य चौकात बॅनर लावायला परवानगी दिली जाणार नाही व ठराविक ठिकाणी योग्य पावती घेवून बॅनर लावण्यास परवानगी दिली जाईल जे कोणी अनाधिकृत बॅनर लावतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक तुषार नकवाल यांनी दिली.

Exit mobile version