Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात पशुधनाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील कोदगांव शिवारातील एकाच्या शेडमध्ये बांधलेल्या २५ हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील कोदगांव येथील समाधान वामन चौधरी यांनी कोदगांव शिवारातील आपल्या शेतातील शेडमध्ये जर्शी वानीची गाय बांधलेली असताना अज्ञात इसमाने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना २२ रोजी रात्री ८ ते २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी समाधान वामन चौधरी यांनी गायीला परिसरात शोधाशोध केली. मात्र गायी मिळून आले नाही. म्हणून २५,००० हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून समाधान यांनी भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना दिपक पाटील हे करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह तालुक्यात पशुधनाची चोरी दिवसागणिक वाढत आहे. यामुळे सर्व सामान्य शेतकरी व दुग्ध व्यावसायिक हतबल झाले आहेत. यामुळे चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version