Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात दिव्यांगांसाठी पूर्व नोंदणी शिबिर

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या पुढाकाराने येथे आज दिव्यांगांसाठी पूर्व नोंदणी शिबिर पार पडले.

आज खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नियोजनातून चाळीसगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी पूर्व नोंदणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल ग्रामीण रुग्णालय व ड्रामा केअर सेंटर येथे सकाळी दहा वाजता नोंदणी शिबिराची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मन की बात कार्यक्रम ऐकून शिबिराला सुरुवात करण्यात आली

व्यासपीठावर तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रमेश सोनवणे सर,जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंस उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजय पाटील, दिनेश बोरसे, सुभाष पाटील भामरेकर, उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील, तालुका सरचिटणीस धनंजय माडोळे, शहर सचिव जितेन्द्र वाघ, अमोल नानकर, नगरसेवक बापू अहिरे, चिरागोद्दिन शेख, प्रभाकर चौधरी, बबन पवार, निवृत्ती कवडे,बंडू पगार, गोरख राठोड, दिलीप गवळी, रवीभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेनकाका जैन, समकित छाजेड,मुकेश गोसावी, बबडी शेख,नगरसेविका संगीता गवळी, अनिल चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सुराणा, गणेश पाटील, सौरव पाटील, आरिफ सय्यद , महसूल, आरोग्य, गटशिक्षण,प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला दिव्यांगांच्या आधारस्तंभ मीनाक्षी निकम,भारतीताई चौधरी यांच्या हस्ते शिबिराला सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकात प्रा.सुनील निकम यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी नेहमी जनतेसाठी, शेवटच्या घटकासाठी विविध शिबिरे, महोत्सव, यात्रा भरवून शासनाचे लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा आम्हाला आनंद आहे.
जिल्हा उपाध्यक्ष के.बी. साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले उन्मेषदादा पाटील तत्कालीन आमदार असताना पंचवीस हजार नागरिकांना संजय गांधी योजनेतून पगार सुरू करून दिले याचा मला अभिमान आहे.

गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर म्हणाले की आजच्या शिबिरातून दिव्यांग बांधवांना आपल्याला लागणारे उपकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. यासाठी एलिम्को या संस्थेची वैद्यकीय तपासणी टीम आजच्या शिबिराला उपस्थित असून दिव्यांग बांधव बंधू-भगिनींनी आपल्याला अपेक्षित असलेले साहित्य मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे जोडत तपासणी करून घेण्यात येणार असून खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आजचे शिबिरात आम्हाला सर्वांना सेवेची करण्याची संधी मला मिळाल्याचे आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

स्वयंदीप संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांनी दिव्यांग बांधवांना येणार्‍या अडीअडचणी संदर्भामध्ये उपस्थित मान्यवरांना अवगत करीत आजच्या शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी खासदार उन्मेशदादा यांचे आभार व्यक्त केले. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खासदार उन्मेश पाटील हे सतत प्रयत्नशील असल्याचा आम्हाला अभिमान असून उन्मेशदादा दिव्यांग बंधू-भगिनींचे मित्र असल्याची गौरोवद्गार मिनाक्षी निकम यांनी व्यक्त केले.

यावेळी शिबिरासाठी महसूल विभागाचे सर्कल शैलेश रघुवंशी, उल्हास देशपांडे, विनोद कुमावत, एस बी बोरसे, योगेश सोनवणे, गणेश लोखंडे, सुनील पवार, दीपक जोंधळे, विस्ताराधिकारी विनायक ठाकूर, सहाय्यक गटविकास अधिकारी के एन माळी, आरोग्य गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी मोलाची मदत केली. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिव्यांग बंधू भगिनींना प्रत्यक्ष जाऊन भेटत त्यांच्या भावना जाणून घेत त्यांना आधार दिला.

उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील यांनी दिव्यांग बंधू-भगिनींनी नोंदणी करताना घ्यावयाची काळजी व व्यक्तिशः भेटी घेत मदतीचा आधार दिला. तसेच दिव्यांग बंधू भगिनी यांची काळजी घेणारे पालक यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सचिव अमोल नानकर यांनी तर आभार तालुका सचिव धनंजय मांडोळे यांनी मांडले.

Exit mobile version